खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील विक्रम मोहिते यांची आ.रोहितदादा पवार विचारमंचच्या खंडाळा तालुकाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
गेल्या १० ऑगस्टपासून ते रुग्णालयात दाखल आहेत. मेंदूवर झालेल्या शस्रक्रियेनंतर त्यांना व्हेन्टिलेटरवर ठेवण्यात आलंय. रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, प्रणव मुखर्जी यांची परिस्थिती खालावत चाललीय.
सर्वोच्च न्यायालयाने सुशांतसिंह राजपूत प्रकरणातील तपास #CBI च्या स्वाधीन करण्याचा आदेश दिला आहे. मला खात्री आहे की महाराष्ट्र सरकार या निर्णयाचा आदर करून चौकशी प्रक्रियेत पूर्ण सहकार्य करेल. मला आशा आहे की, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी #CBI मार्फत २०१४ मध्ये सुरू झालेल्या आणि अद्याप निराकरण होऊ न शकलेल्या चौकशी प्रक्रियेप्रमाणे या तपासकार्याची परिणती होणार नाही. - शरद पवार
केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कॅबिनेट बैठकीत झालेल्या या महत्त्वपूर्ण निर्णयाची माहिती दिली. आता सरकारी संस्थेत नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व इच्छुक उमेदवारांसाठी सामायिक परीक्षा असेल. त्यासाठी राष्ट्रीय भरती संस्था राष्ट्रीय भरती एजन्सी स्थापन करण्यात येणार आहे.
खासदार संजय राऊत यांनी डॉक्टरांबाबत काढलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ सातारा येथे भाजपच्या वैद्यकीय आघाडी सातारा जिल्हा, सातारा शहर आणि सातारा ग्रामीण यांच्यातर्फे आंदोलन करण्यात आले. पोवई नाका येथे जोरदार निदर्शने करून अप्पर जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्यपाल कोश्यारी यांना निवेदन पाठवण्यात आले.
'मुलींच्या विवाहासाठी किमान वयोमर्यादेवर पुन्हा विचार करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे. समितीने संबंधित अहवाल सादर केल्यानंतर योग्य तो निर्णय घेण्यात येईल.
अंबवडे, ता. खटाव येथील वि.का.स.सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी गावातील आ. प्रभाकर घार्गे यांचे समर्थक युवा कार्यकर्ते दत्तात्रय प्रल्हाद पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर उपाध्यक्षपदी बाळासाहेब कुंडलिक पवार यांना संधी देण्यात आली आहे.
येत्या शुक्रवारी, १४ ऑगस्टपासून सुरू होत असलेल्या राजस्थान विधानसभेच्या अधिवेशनापूर्वी सचिन पायलट यांच्या समर्थक आमदारांशी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी संपर्क साधला आणि त्यांचे मन वळविलं. परिणामी, पायलट समर्थक आमदार हॉटेल सोडून निघून जाऊ लागले आणि पायलट एकाकी पडले. त्यामुळे पायलट यांनीही काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांशी संपर्क साधायला सुरुवात केली.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गटाच्या) फलटण तालुक्यातील नूतन कार्यकारिणीच्या निवडी नुकत्याच जाहीर झाल्या असून, यामध्ये ‘रिपाइं’ आठवले गट फलटण तालुकाध्यक्षपदी संजय निकाळजे व फलटण शहराध्यक्षपदी लक्ष्मण अहिवळे यांची बिनविरोध निवड झाली.