maharashtra

स्विफ्ट आणि मालवाहतूक टेम्पोच्या धडकेमध्ये महिला जखमी


त्रिपुटी, तालुका कोरेगाव च्या हद्दीत कोरेगाव रस्त्यावर मालवाहतूक टेम्पो आणि स्विफ्ट कार यांची धडक होऊन यामध्ये एक महिला जखमी झाल्याची घटना दिनांक 20 मार्च रोजी सकाळी 11 च्या दरम्यान घडली. याप्रकरणी राहुल दशरथ भोसले शांतीनगर कोरेगाव यांनी फिर्याद दिली आहे.

सातारा : त्रिपुटी, तालुका कोरेगाव च्या हद्दीत कोरेगाव रस्त्यावर मालवाहतूक टेम्पो आणि स्विफ्ट कार यांची धडक होऊन यामध्ये एक महिला जखमी झाल्याची घटना दिनांक 20 मार्च रोजी सकाळी 11 च्या दरम्यान घडली. याप्रकरणी राहुल दशरथ भोसले शांतीनगर कोरेगाव यांनी फिर्याद दिली आहे.
दाखल झालेल्या फिर्यादीनुसार, भोसले हे आपल्या पत्नीसह स्विफ्ट गाडीतून साताऱ्यावरून कोरेगाव कडे चालले होते. त्यावेळी त्रिपुटी गावच्या हद्दीत कोरेगाव कडून साताऱ्याला जाणाऱ्या मालवाहतूक इंट्रा टेम्पो अचानक भरधाव वेगाने आला असता स्विफ्ट गाडीच्या समोरील बॉडीवर पलटी झाला. यामुळे फिर्यादी यांची पत्नी रुक्मिणी हिला गाडीतील डॅशबोर्डला धडकून डोक्याला मार लागला आणि डाव्या हाताचे मनगट फ्रॅक्चर होऊन त्या जखमी झाल्या. तसेच टेम्पो स्विफ्ट गाडीवर आढळल्याने गाडीच्या पुढील बॉडीचे नुकसान झाले. संबंधित टेम्पो चालकावर कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हवालदार साळुंखे तपास करत आहेत.