आर्थिक फसवणूक प्रकरणी एकावर वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : आर्थिक फसवणूक प्रकरणी एकावर वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 21 मार्च 2018 ते 10 डिसेंबर 2020 दरम्यान मायणी, ता. खटाव येथील मायणी ग्रामपंचायतीमध्ये सुरज चंद्रकांत खांडेकर याने त्याच्या आर्थिक फायद्यासाठी ग्रामपंचायतीचे नमुना नंबर दहा कर व फी बाबत बनावट पावती पुस्तक तयार करून त्याद्वारे ग्रामपंचायत हद्दीतील पाच जणांकडून एकूण 1 लाख 19 हजार 504 रुपये वसुली करून ग्रामपंचायतीची फसवणूक केली आहे. याप्रकरणी खांडेकर याच्यावर वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक पालेकर करीत आहेत.


