maharashtra

चोरीचा प्रयत्न केल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा


चोरीचा प्रयत्न केल्या प्रकरणी दोघांवर कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सातारा : चोरीचा प्रयत्न केल्या प्रकरणी दोघांवर कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 18 मार्च रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास जीवन शहाजी रावते रा. दत्तनगर, कोडोली आणि विजय भाई (पूर्ण नाव माहित नाही) यांनी मोटरसायकल वरून येऊन राहुल दिलीप बर्गे रा. त्रिपुटी, ता. कोरेगाव यांच्या राहत्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात शिरून चोरी करण्याचा प्रयत्न केला. यातील विजय भाई हा तेथून मोटरसायकल वरून पळून गेला आहे. याबाबतची नोंद कोरेगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पोलीस नाईक साळुंखे करीत आहेत.