maharashtra

एकास मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा


एकास मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सातारा : एकास मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 2 जानेवारी रोजी रात्री सव्वा सात वाजता सुमारास खर्शी, तालुका जावली गावच्या हद्दीत गणपती मळा येथील रस्त्यावर नरेंद्र बाजीराव रोकडे वय 47 राहणार बेलावडे, तालुका जावली यांना तेथीलच यश उर्फ सनी बळवंत बगाडे आणि एका अनोळखी इसमाने त्यांच्या ताब्यातील मोटरसायकल वरून येऊन पाठीवर लोखंडी रॉडने मारहाण केली. याबाबतची फिर्याद मेढा पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली असून अधिक तपास पोलीस हवालदार आय. डी. मेटकरी करीत आहेत.