maharashtra

विवाहितेवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा


Crime against one for abusing a married woman
वाई तालुक्यातील लोहारे पिंपळाचा मळा येथे विवाहितेवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला आहे.

वाई : वाई तालुक्यातील लोहारे पिंपळाचा मळा येथे विवाहितेवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वाई तालुक्यातील एका गावातील एक विवाहिता दिनांक ९ रोजी आपल्या शेतात निघाली असता पोपट सदाशिव शिंदे राहणार लोहारे पोस्ट बोपर्डी तालुका वाई याने त्या विवाहितेवर अत्याचार केला. यासंदर्भात कोणास काही बोललीस तर तुला मारून टाकीन आणि तुझ्या मुलांनाही मारून टाकीन अशी धमकी पोपट शिंदे याने दिली. याप्रकरणी विवाहितेने वाई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक एस.टी. सोमदे करीत आहेत.