maharashtra

तांब्याच्या तारेची चोरी


मारूल हवेली, ता. पाटण गावच्या हद्दीत ट्रान्सफॉर्मर मधील तांब्याच्या तारेची चोरी झाल्याची तक्रार मल्हार पेठ पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

सातारा : मारूल हवेली, ता. पाटण गावच्या हद्दीत ट्रान्सफॉर्मर मधील तांब्याच्या तारेची चोरी झाल्याची तक्रार मल्हार पेठ पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 17 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी दरम्यान अज्ञात चोरट्याने मारूल हवेली, ता. पाटण गावच्या हद्दीत असणाऱ्या दोघाणी नावाच्या शिवारात असलेल्या ट्रान्सफॉर्मर च्या डीपी स्ट्रक्चर चे साईड चॅनल काढून, तो खाली पाडून, त्यातील ऑइल सांडून ट्रान्सफॉर्मरच्या आतील सुमारे 80 हजाराची तांब्याची तार चोरून नेली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्या विरोधात मल्हार पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक फौजदार आर. एस. अंकुशी करत आहेत.