मुस्लिम बांधवांविरोधात भाषण करणाऱ्या विक्रम पावसकरांवर कारवाई करा
रमेश उबाळे यांचे पोलीस अधीक्षकाना निवेदन
विक्रम पावसकर यांनी कोरेगाव तालुक्यातील वाठार स्टेशन येथे दुर्गा माता दौड दरम्यान मुस्लिम बांधवांच्या विरोधात आक्षेपार्ह भाषण करून हिंदू-मुस्लिम धर्मात तेढ निर्माण करण्याचा त्यांचा स्पष्ट हेतू दिसून येत असल्याने पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करावी. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सामाजीक न्याय विभागाचे अध्यक्ष रमेश उबाळे यांनी पोलीस अधिक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पुसेगाव : भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य विक्रम पावसकर यांनी कोरेगाव तालुक्यातील वाठार स्टेशन येथे दुर्गा माता दौड दरम्यान मुस्लिम बांधवांच्या विरोधात आक्षेपार्ह भाषण करून हिंदू-मुस्लिम धर्मात तेढ निर्माण करण्याचा त्यांचा स्पष्ट हेतू दिसून येत असल्याने पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करावी. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सामाजीक न्याय विभागाचे अध्यक्ष रमेश उबाळे यांनी पोलीस अधिक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत दिलेल्या निवेदनात रमेश उबाळे यांनी म्हटले आहे, विकम विनायक पावसकर हे दुर्गा माता दौड संपन्न करण्यासाठी वाठार येथे आले होते.त्यांनी यावेळी येथे केलेल्या भाषणामध्ये मार्गदर्शन करताना सामाजीक भान विसरून हिंदू-मुस्लिम जातीय तेढ निर्माण व्हावी या हेतूने वारंवार मुस्लिम बांधवांविषयी व मुस्लिम धर्मविषयी अतिशय आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने मुस्लिम बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यांनी आपल्या भाषणातुन सामाजिक सलोखा बिघडवण्याचे काम केले आहे. विक्रम पावसकर यांनी एकेरी मत मांडून मुस्लिम बांधवांची बदनामी केल्याचे दिसते. त्यांचे केलेले भाषण पहाता समाजातून मुस्लिम समाजाला वेगळे करण्याचा उद्देश दिसून येत आहे.मराठा-मुस्लिम समाजात तेढ निर्माण करण्याची भाषा त्यांच्या भाषणातुन स्पष्ट दिसत आहे. कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचे ते समाज प्रबोधनाच्या नावाखाली करत आहेत.विक्रम पावसकर यांची ताबडतोब पोलीस चौकशी करून त्यांचेवर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा आम्ही दलित बांधव रस्त्यावर उतरून आंदोलन करू. मुस्लिम समाजाला न्याय देण्याची कार्यवाही आपल्या कार्यालयातुन व्हावी, अशी आमची अपेक्षा आहे.
दरम्यान मुस्लीम समजाने रमेश उबाळे यांना लेखी निवेदन दिले असून विक्रम पावसकर हे कायद्याचे भान व भीती नसल्यासारखे वागत आहेत. हिंदू-मुस्लिम समाजामध्ये एकीचे वातावरण असताना आपले एकेरी मत मांडून दोन धर्मामध्ये तेढ निर्माण करून सामाजिक सलोखा बिघडवीण्याचा पावसकर यांचा हेतू आहे. आपण याबाबत एक पाऊल पुढे चालून मुस्लिम समाजाला न्याय मिळवून द्यावा. याबाबत आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना माहिती देऊन याप्रकरणात लक्ष घालण्याची मागणी करावी.
मुस्लीम समाजाच्या भावना वरिष्ठांपर्यंत पोहचवणार
याप्रकरणी रमेश उबाळे मुस्लिम समाजातील लोकांशी चर्चा करत असतानाच अनेक मुस्लिम बांधव भावनिक झाले होते त्यांच्या भावना जाणून घेतल्यानंतर तुमच्या सर्व भावना मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरीष्ठ नेत्यांपर्यंत पोहचवणार आहेच परंतु पोलिसांकडून न्याय न मिळाल्यास वेळप्रसंगी रस्त्यावर आंदोलन करणार असल्याची ग्वाही रमेश उबाळे यांनी मुस्लिम बांधवाशी चर्चा करताना यावेळीं दिली.


