विजेचा शॉक लागल्याने युवकाचा मृत्यू झाल्याची नोंद कोरेगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सातारा : विजेचा शॉक लागल्याने युवकाचा मृत्यू झाल्याची नोंद कोरेगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 18 मार्च रोजी दुपारी पाच वाजण्याच्या पूर्वी जांब बुद्रुक, ता. कोरेगाव गावच्या हद्दीतील माळ नावाच्या शिवारात असलेल्या उंबराच्या झाडावर ऋषभ संतोष डांगे वय 24, रा. जांब बुद्रुक, ता. कोरेगाव हा शेळ्यांना चारा आणण्यासाठी चढला होता. झाडाच्या फांदीचा पाला तोडत असताना फांदी अर्धवट तुटून तेथील विजेच्या तारेवर पडल्याने वृषभ याचा शॉक लागून मृत्यू झाला. अधिक तपास पोलीस नाईक साळुंखे करीत आहेत.


