हॉस्पिटलमधील बॅटर्या चोरल्या प्रकरणी सहाजणांना अटक
फलटण शहर पोलीस ठाण्याचे यश; 3 लाख 20 हजारांचा मुद्देमाल हस्तगत
फलटण शहरातील एका हॉस्पिटलमधील बॅटर्या चोरल्या प्रकरणी सहाजणांना पकडण्यात फलटण शहर पोलिसांना यश आले आहे. चोरट्यांकडून 3 लाख 20 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सातारा : फलटण शहरातील एका हॉस्पिटलमधील बॅटर्या चोरल्या प्रकरणी सहाजणांना पकडण्यात फलटण शहर पोलिसांना यश आले आहे. चोरट्यांकडून 3 लाख 20 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फलटण शहर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दि. 10 फेब्रुवारी रोजी दाखल झालेला होता. या गुन्ह्यातील फिर्यादी यांचे आडसुळ नसिंग होम या हॉस्पीटल मधील खोलीत लावलेल्या युपीएस च्या 6 बॅटर्या हॉस्पीटलचे पाठीमागील गेटचे व युपीएस ठेवलेल्या खोलीचे कुलुप हेक्सा ब्लेडच्या सहाय्याने कापुन, फिर्यादीच्या संमत्तीशिवाय हॉस्पीटलच्या रुममध्ये प्रवेश करुन, रुममध्ये ठेवलेल्या 60 हजार रुपये किमतीच्या युपीएसच्या लिव्हफास्ट कंपनीच्या 6 बॅटर्या कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याबाबत फिर्यादी यांनी दि. 10 फेब्रुवारी रोजी तक्रार दिलेली होती.
तक्रार दाखल होताच पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापुसाहेब बांगर, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, पोलीस निरीक्षक दादासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि नितीन केनेकर, सहा.पोलीस उपनिरीक्षक संतोष कदम, पोलीस हवालदार फरांदे, पोलीस नाईक सचिन जगताप, पोलीस कॉन्स्टेबल काकासाहेब कर्णे, पोलीस कॉन्स्टेबल अतुल बडे यांनी घटनास्थळी भेट देउन, सीसीटीव्ही फुटेज व तांत्रीक माहीतीच्या आधारे, गुन्ह्याचा अंत्यंत उत्कृष्टरित्या तपास करुन, हा घरफोडीसारखा गुन्हा उघड करुन, गुन्ह्यामध्ये मत्यक्ष सहभाग असणार्या सौ.सविता संतोष जाधव वय 35 वर्षे, सौ. अलका युवराज घाडगे वय 40 वर्षे (दोन्ही रा.कुंभारटेक मलटण ता.फलटण), सौ. सुगंधा शिवाजी जाधव वय 40 वर्षे, वनिता चंद्रकांत घाडगे वय 47 वर्षे (दोन्ही रा.स्वामी समर्थ मंदीराजवळ, मलटण, फलटण जि.सातारा), किरण भिमराव घाडगे वय 29 वर्षे रा.कुंभाररेक मलटण, फलटण जि.सातारा यांना व चोरीचा माल घेणारा आरोपी राहुल मारुती भोरे रा. मलटण,फलटण अशा एकुण 6 आरोपींना अटक करुन, त्यांच्याकडुन चोरलेल्या 60 हजार रुपये किंमतीच्या युपीएसच्या लिव्हफास्ट कंपनीच्या 6 बॅटर्या, चोरीकरीता वापरलेली मारुती ओमनी कार नंबर-एमएच-11/वाय-6388, मोबाईल, एक हेक्सा ब्लेड असा एकुण 3 लाख 20 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल आरोपींकडुन हस्तगत करुन गुन्हा उघडकीस आणला आहे.


