maharashtra

पोलीस असल्याचे भासवून 97 हजारांना गंडा


पोलीस असल्याचे भासवून एकाने 97 हजारांना गंडा घातल्याची फिर्याद पुसेगाव पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

सातारा : पोलीस असल्याचे भासवून एकाने 97 हजारांना गंडा घातल्याची फिर्याद पुसेगाव पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 6 फेब्रुवारी रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास कटगुण, ता. खटाव गावच्या हद्दीत दहिवडी पुसेगाव जाणाऱ्या रस्त्यावर नारायण राजाराम गायकवाड वय 67, रा. कटगुण, तालुका खटाव हे त्यांच्या स्कुटी वरून जात असताना एका अनोळखी इसमाने त्यांना गाडी थांबवण्यास सांगितले आणि तुम्ही गांजा घेऊन जाताय का? आमची चेकिंग सुरू आहे, मला तुमच्या गाडीची विकी दाखवा मी पोलीस आहे असे म्हणत पोलीस ओळखपत्र दाखवून तुमच्या जवळील सर्व साहित्य काढून माझ्याकडे द्या मी तुमच्या गाडीच्या तिकीट मध्ये ठेवतो असे सांगितले त्याच्यावर विश्वास ठेवून नारायण गायकवाड यांनी त्यांच्याकडील सोन्याची चेन आणि रोख 52 हजार रुपये असे एकूण 97 हजार रुपयांचा ऐवज त्या अज्ञात इस माकडे दिला हाय वस तिकीट ठेवण्याचे बसून त्या भामट्याने नारायण गायकवाड यांची 97 हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन फसवणूक केली आहे. याबाबतचा गुन्हा पुसेगाव पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला असून अधिक तपास एस. बी. येवले करीत आहेत.