पाटण तालुक्यात घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी सुमारे 31 लाखांचा मुद्देमाल लंपास केल्याची नोंद पाटण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सातारा : पाटण तालुक्यात घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी सुमारे 31 लाखांचा मुद्देमाल लंपास केल्याची नोंद पाटण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 28 डिसेंबर रोजी सकाळी साडेदहा ते दुपारी साडेतीन वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी रत्ना सुभाष शिर्के रा. पाटण, ता. पाटण यांच्या घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून घरातील तिजोरीत असणारे इतर साहित्य विस्कटून 55 हजार रुपये ची रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण 31 लाख 5 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याप्रकरणी पाटण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक पाटील अधिक तपास करीत आहेत.


